By: लेखक- विद्वत्रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, संकलन- द. पा. जोशी Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar, Compiled by D. P. Joshi
Language : मराठी (Marathi)
माणूस जीवन जगताना काही गोष्टी या ठरवून साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. या ठरविलेल्या गोष्टी साधल्या तर त्यास समाधान लाभते. हेच समाधान त्याच्या जीवनात सुख निर्माण करते, जीवनातील आनंद वाढवते, आत्मविश्वास वाढवते आणि पुढे अधिक जबाबदार्या घेण्यास प्रवृत्त करून जीवन प्रगतीपथावर ठेवते. पण, हे सर्व करताना जर आपणा स्वत:स जर आपलीच ओळख नसेल तर आपण घेत असलेल्या प्रयत्नांना आपणास अपेक्षित यश मिळत नाही. आपली आपणासच ओळख नसेल तर आपण कोठे चुकतो आहोत हेसुद्धा कळणे अवघड होते. प्रत्यकास ही स्वत:ची तोंडओळख होणे अत्यंत गरजेचे आहे. ही होण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञ, अर्थशास्त्री, सद्गुरु परम पूजनीय डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाचा संकलित स्वरूपातील ‘तोंडओळख’ हा ग्रंथ वाचकांसाठी नक्कीच उपयोगी ठरतो. या ग्रंथात सद्गुरु डॉ. पारनेरकर महाराज यांस त्यांच्या दर्शनाला, भेटीला आलेल्या व्यक्तींनी विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना प. पू. डॉ. पारनेरकर महाराजांनी दिलेली उत्तरे त्यांच्या शिष्यांनी लिखित स्वरूपात नोंदविली असून, त्या लिखाणाचे हे संकलन होय. जे प्रश्न आपणा सर्वांना रोजचे जीवन जगताना पडतात, पण काही कारणाने अनुत्तरीत राहतात, तेही वाचकांस येथे उत्तरासहित सापडतील. आपण जगताना आपल्या मनात काही संकल्पना अशा असतात की, ज्याचा खरा अर्थ आपणास ठाऊक नसतो अथवा त्या संकल्पनांचा व्यवहारात कसा उपयोग केला जावा हेही कळत नसते. बर्याच वेळा आपण कवटाळून बसलेल्या संकल्पना वा सिद्धांत आपल्याच प्रगतीत अडसर निर्माण करतात वा मेंटल ब्लोकेज चे काम करतात. या ग्रंथाच्या वाचनाने हा तिढा सुटतो व त्यांचा खरा अर्थ कळून निर्माण झालेले अडसर दूर होतात, हा जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या अनेक वाचकांचा अनुभव आहे. ग्रंथवाचनाने पूर्णवाद या परम पूजनीय सद्गुरु डॉ. रा. प्र. पारनेरकर यांच्या तत्त्वज्ञानाचीही तोंडओळख वाचकांस होते. ग्रंथाची मांडणी प्रश्नोत्तर वा ठराविक मुद्द्यांच्या यथायोग्य मांडणीच्या स्वरूपात असून, प्रश्न-मुद्दे हे सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत व प. पू. डॉ. पारनेरकर महाराजांनी दिलेल्या उत्तराची भाषा अत्यंत सरळ व समजण्यास अत्यंत सुलभ अशी आहे.
By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)
By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)
By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)
By: प्रकाशक - श्री विमल पब्लिशर्स प्रा. लि. Publisher - Shree Vimal Publishers Pvt. Ltd.