By: रचयिता- विद्वत्रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, अर्थविवेचन- विद्यासागर डॉ. ॲड. विष्णु रामचंद्र पारनेरकर
Language : मराठी (Marathi)
ग्रंथ विशेष-
पृष्ठ संख्या: एकूण १५६
आवृत्ती: पहिली, फेब्रुवारी २०२१
आकार: १४० मि.मी. x २१६ मि.मी.
परम पूजनीय सद्गुरु डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर महाराज रचित ‘स्वबोध’ ग्रंथ व त्याचा परम पूजनीय सद्गुरु विद्यासागर डॉ. विष्णुमहाराज पारनेरकर यांनी सांगितलेला अर्थ हे दोन्हीही या ग्रंथात समाविष्ट असून अभ्यासकांसाठी नक्कीच संग्राह्य व अभ्यसनीय असा ग्रंथ आहे.
‘स्वबोध’ म्हणजे आपणा स्वत:स आपला विषय करून अभ्यासणे होय. ‘स्वबोध’ म्हणजे स्व-संपर्क साधून सातत्याने करावयाचे आत्मावलोकन व आत्मपरीक्षण होय. ‘स्वबोध’ म्हणजे अंतर्मुख होऊन स्वत:चेच स्वत:ला झालेले आकलन होय. हे आकलन तेव्हाच होऊ शकते, जेव्हा मनुष्य स्वत:विषयीच्या अभ्यासाचा वा स्वत:विषयी शिकण्याचा सतत प्रयत्न करतो. डॉ. पारनेरकरांनी स्वबोधात जीवनाच्या तिन्ही अंगांचे साक्षात्कारी दर्शन ओवी रूपाने घडविले असून, हीच या ग्रंथाची अपूर्वता, नवीनता आहे.
स्वबोधचा अभ्यास व त्याबरहुकूम जगल्याने, जीवनात परिवर्तन घडून स्वत:स स्वत:ची ओळख तर होईलच, पण जीवन प्रभुत्वाने जगण्याची गुरुकिल्ली हाती येईल.
परम पूजनीय सद्गुरु डॉ. विष्णुमहाराजांनी याचा यथार्थ शिष्यांसाठी सांगून त्यावरील चिंतन, मनन व त्यानुसारच्या आचारासाठीचा मोठा प्रदेश खुला करून दिला आहे.
ग्रंथात एकूण ५ दशक असून ४४ समास आहेत. ग्रंथाची पूर्तता ‘स्वबोध’ ग्रंथाच्या आरतीने केलेली आहे. प्रेत्यक समासानंतर परम पूजनीय सद्गुरु डॉ. विष्णुमहाराजांनी सांगितलेला त्या समासाचा अर्थ दिला आहे.
By: ॲड. विष्णु रा. पारनेरकर (Adv. Vishnu R. Parnerkar)
By: ॲड. वि. रा. पारनेरकर (Adv. V. R. Parnerkar)
By: Dr. R. P. Parnerkar Dr. V. R. Parnerkar
By: Adv. V. R. Parnerkar (ॲड. विष्णु रा. पारनेरकर)