By: लेखक- विद्वत्रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar
Language : मराठी (Marathi)
ग्रंथ विशेष
आवृत्ती: सहावी– जून २०१०
आकार: १४० मि.मी. x २१६ मि.मी.
माणसाला आपला विकास हा सर्व स्तरांवर सारखाच व परिपूर्ण करावा लागतो. केवळ आधिभौतिकात झालेला विकास वा प्रगती मानसिक समाधान वा शांती देईलच याची खात्री नसते. आधिभौतिकाबरोबरच आध्यात्मिक तप जर नसेल तर व्यक्तिमत्व, त्यातील उणेपणा हा समाजात उघड दिसतो. त्यामुळे आध्यात्मिक विकासही तेवढाच आवश्यक आहे. ही दोन्ही स्तरांवरील प्रगती कायम ठेवण्यासाठी आधिदैविकाचीही आवश्यक वा जोड लागतेच. पण या तिन्ही विषयांची यथार्थ कल्पना व त्यांचा अभ्यास आपणास असणे गरजेचे असते.
‘संपर्क’ हा प. पू. डॉ. पारनेरकर महाराज लिखित ग्रंथ असून त्यात आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक असे तीन खंड आहेत. तिन्ही खंडांचे लिखाण हे सूत्ररूपात असून, पहिल्या आध्यात्मिक खंडात 43 सूत्र आहेत. दुसर्या आधिभौतिक खंडात 47 सूत्र आहेत व शेवटच्या तिसर्या खंडात 32 सूत्र आहेत. ग्रंथाची पूर्णता ही संपर्कावरील पाच कवनांनी (प्रार्थनारूपातील) केली आहे. ग्रंथास पुरस्कार लोकनायक माधव श्रीहरी अणे यांचा असून, ग्रंथाचे प्रास्ताविक प. पू. डॉ. पारनेरकर महाराजांनी लिहिलेले आहे.
By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)
By: Dr. R. P. Parnerkar
By: విద్వత్ రత్న డా. రామచంద్ర ప్రహ్లాద్ పార్నర్కర్ (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)
By: लेखक- विद्वत्रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar